Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: पत्‍नी माहेरी असल्‍याने व्‍यसनाच्‍या आहारी; यातूनच उचलले टोकाचे पाऊल

पत्‍नी माहेरी असल्‍याने व्‍यसनाच्‍या आहारी; यातूनच उचलले टोकाचे पाऊल

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर शहरातील बदाडे नगर येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय ट्रक चालकाने रिंगरोड लगतच्या शेतात लिंबाच्या झाडाला (Latur News) गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सिद्धांत शिवाजी सांगलीकर असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत गांधी चौक (Police) पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (letest Marathi News)

मृत सिद्धांत सांगलीकर याचे सात- आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्‍याची पत्नी सध्या माहेरीच राहत असून, तो ट्रकचालक असल्याने सतत घराबाहेर असायचा. अलीकडे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता. तो घरातही कोणाशी फारसे बोलत नव्हता. यातूनच अलीकडे व्यसनाच्या आहारी गेला होता. सकाळी घरातून बाहेर पडला. त्याने रिंगरोड परिसरात एका शेतात विहिरीलगत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सालगडी शेतात गेल्‍यानंतर प्रकार आला समोर

दरम्यान, सालगडी उसाला पाणी देण्यासाठी तेथे मोटर चालू करायला गेला; त्यावेळी झाडाला मृतदेह लटकल्याचे आढळून आले. याची माहिती त्याने शेतमालक प्रदीप स्वामी यांना दिली. घटनास्थळी गांधी चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT