Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur Politics : लातूरमध्ये राजकीय वातावरण तापलं; अमित देशमुखांच्या विधानाने मविआत वादाचे संकेत

Latur News : लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा येथे आम्हाला कोंग्रेस पक्षाचा आमदार पाहिजे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबते सुरू आहेत

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. औसा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याचे संकेत सद्या दिसत आहेत. कारण औसा विधानसभेच्या जागेवर या अगोदर ठाकरे गटाच्या शिवसेने दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी औसा आणि निलंगा विधानसभेच्या  जागेवरून एक सूचक विधान केलं आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा आणि निलंगा येथे आम्हाला कोंग्रेस पक्षाचा आमदार पाहिजे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबते सुरू आहेत. आमचे पुर्वी इथ आमदार होते म्हणून हि जागा आम्हाला द्यावी; असा दावा शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र आता काँग्रेसचे अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी देखील औसा विधानसभा क्षेत्रावर दावा ठोकला आहे. परंतु महाविकास आघाडीचे नेते यात समन्वयाने निर्णय करतील; अशी देखील चर्चा आहे. 

काँग्रेसचे औसात सर्वाधिक निवडणूक जिंकल्या; देशमुख 

मात्र स्वातंत्र्याच्या काळापासून काँग्रेसने औसा विधानसभेत सर्वाधिक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडेच ही जागा असली पाहिजे अशी भूमिका मांडत अमित देशमुख यांनी या जागेवर काँग्रेसचा दावाच ठोकला आहे. त्यामुळे अमित देशमुख यांच्या विधानाने सध्या महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याचे संकेत दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT