Latur Vivekanand Chowk Police SAAM TV
महाराष्ट्र

Latur News : पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दुर्गंधी सुटली होती; दार तोडून बघितलं, आतील दृश्य बघून हादरलेच

Latur News : लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायानं आयुष्य संपवल्याची घटना घडली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

दीपक क्षीरसागर, लातूर

Latur News : लातूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद विवेकानंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लातूर (Latur) येथील एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने घरी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने चार दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. तानाजी लहू करमाळे (वय ३६) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात (Police Station) नोंद करण्यात आली आहे.

लातुरातील सिद्धार्थ सोसायटीत पोलीस शिपाई तानाजी करमाळे राहत होते. लातूर जिल्हा पोलीस (Latur Police) दलात शिपाई म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी घरात आत्महत्या केली. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे घराचे दार तोडून बघितले असता आतील दृश्य बघून सगळेच हादरले.

तानाजी करमाळे हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT