Latur Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Latur Bajar Samiti : लातूर बाजार समितीचे १०० कोटींचे नुकसान; आडते- खरेदीदारांच्या वादात १४ दिवसांपासून व्यवहार बंद

Latur News : लातूर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अतिशय विश्वासाची मानली जाते.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या १४ दिवसांपासून बाजारात शेतमालाचे सौदे बंद आहेत. यामुळे बाजार समितीला साधारण शंभर कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी आडते आणि खरेदीदारांत वाद होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समितीतील व्यवहार कधी सुरु होतील हे सांगणे अद्याप निश्चित नाही. 

लातूर (Latur) येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अतिशय विश्वासाची मानली जाते. नांदेड, धाराशिव, बीड, परभणी (Parbhani) यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावरती भागातून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आणत असतात. मात्र आडत्यांना खरीदाराकडून वेळेत पैसे मिळत नसल्याने खरेदीनंतर तीन दिवसात रक्कम मिळावी; यासाठी अडते आणि खरेदीदार यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्यामुळे मागच्या १४ दिवसापासून बाजार समिती कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. 

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) मागच्या १४ दिवसापासून संप सुरू आहे. आडते आणि खरीददारांच्या वादात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे मागच्या १४ दिवसापासून कुठल्याच शेतमालाचे सौदे झाले नसल्याने बाजार समितीला तब्बल १०० कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजार समितीचे प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांची (Farmer) मोठी गैरसोय झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT