Latur : अहमदपुरात राष्ट्रवादी-भाजप मध्ये जुंपली! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : अहमदपुरात राष्ट्रवादी-भाजप मध्ये जुंपली!

कारखान्याचे भांडवल करून आजी-माजी आमदारात चांगलाच वाद उफाळल्याची चर्चा तालुक्यात रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात सिध्दी शुगर कारखाना आणि लिफ्ट इरिगेशन या दोन विषयांचे भांडवल पुढे करत आजी-माजी आमदारात आरोप प्रत्यारोप करून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी आमदार विनायकराव पाटील यांनी केला आहे. तर तर श्रेय घेण्यासाठी विनायकराव पाटील केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.

हे देखील पहा :

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी तालुक्यातील लिफ्ट इरिगेशनमध्ये भ्रष्टाचार केला असून सिद्धी शुगर कारखान्यात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना FRP प्रमाणे ऊसाचा दर दिला जात नाही. सिध्दी शुगर कारखान्याची मनमानी चालू असून शेतकऱ्यांची लुट होत आहे. आजपर्यंत शेतकऱ्यास FRP प्रमाणे ऊसाला भाव दिला नाही. त्यांनी ठरवतेल तेच भाव कारखाना वीस ते तीस कोटी रुपये बँकेत ठेवून व्याज घेतो. मात्र, शेतकरी अडचणीत असतांना त्यांना पैसे देत नाही. असा आरोप करून ऊसाला चांगला भाव द्यावा,अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला माजी आमदार विनायकराव पाटील यांनी दिला असून अहमदपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर इथे पत्रकार परिषद घेऊन, ऊस बिलाची एफ.आर.पी रक्कम १५ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती दिली. माझ्या विकास कामाचा धुमधडाका बघुन धरणे, आंदोलन करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सध्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजेस मध्ये रुपांतर होत आहे. तालुक्याला मिळणारा निधी बघुन त्यांना कसतरी वाटतय असा टोला बाबासाहेब पाटील यांनी लगावला आहे.

मात्र कारखान्याचे भांडवल करून आजी-माजी आमदारात चांगलाच वाद उफाळल्याची चर्चा तालुक्यात रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT