EKNATH SHINDE’S BIG MOVE IN LATUR: 17 INDEPENDENT CANDIDATES JOIN SHIV SENA SaamTV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

Latur Municipal Corporation Election: लातूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद वाढवलीय. लातूरमध्ये १७ अपक्ष उमेदवारांनी अधिकृतपणे शिवसेनेत पक्षात प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय हालचालीमुळे लातूरमधील निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

Bharat Jadhav

  • लातूरमध्ये शिवसेनेचा मोठा राजकीय डाव

  • १७ अपक्ष उमेदवारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

  • निवडणूक समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रवेश करून घेण्याचा धडाका लावलाय. लातूरमध्ये शिवसेनेनं मोठा डाव टाकत महापालिकेच्या निवडणुकीत उभे असलेल्या तब्बल १७ अपक्षांचा शिवसेनेत पक्षात प्रवेश करून घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला. एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिंदेंच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी झालीय.

लातूर महानगरपालिकेतील १७ अपक्ष उमेदवारांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांची भेट घेत या १७ जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात काहीजण भाजपमध्ये तर काहीजण स्वतंत्र निवडणूक लढवणारे तर काहीजण इतर पक्षातील आहेत. या सर्वांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढलीय.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 'भेंडी जेल' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा वापर

Shocking : ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार; ६० वर्षांच्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर

Maharashtra News Live Update: खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना दिली रामाची उपमा

Actor Harassment: प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; मानधन मागितल्यावर केली मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी

Gold Price Today: सोनं 6,662 रुपयांनी आणि चांदी 22,314 रुपयांनी स्वस्त; ही घसरण किती दिवस राहणार?

SCROLL FOR NEXT