लातूरमध्ये आयकर अधिकाऱ्याची मुलाकडून हत्या
कौटुंबिक वादातून केली हत्या
मुलाने वडिलांच्या पोटात चाकू भोसकून संपवलं
उपचारादरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू
लातूरमध्ये आयकर अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुलानेच पोटात चाकू भोसकून बापाला संपवलं. कृष्णकुमार सन्मुखराव असं हत्या झालेल्या अधिकाऱ्याचे नाव होतं. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येमागचं कारण अद्याप समोर आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या खोपेगाव शिवारात ही घटना घडली. जन्मदात्या वडिलाची मुलाने हत्या केली. कृष्णकुमार सन्मुखराव असं हत्या झालेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव होते. कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि या वादात मुलाने वडिलांवर चाकूने वार केले. गंभीररित्या जखमी झालेल्या आयकर अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, कृष्णकुमार सन्मुखराव हे आयकर कार्यालयात अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या मुलाने मंगळवारी दुपारी पोटात चाकू भोसकून त्यांची हत्या केली. कृष्णकुमार सन्मुखराव यांनी काही दिवसांपूर्वीच खोपेगाव शिवारात प्लॉट घेऊन नुकतेच घर बांधले होते. याच ठिकाणी त्यांचा आणि मुलाचा घरगुती कारणावरून वाद झाला. या वादात त्यांचा मुलगा शंतनुने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने त्यांच्या पोटात चाकू भोसकला.
मुलाने केलेल्या हल्ल्यात कृष्णकुमार गंभीररित्या जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण जास्त रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आयकर अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा शंतनु सन्मुखराव याच्याविरोधात लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. कृष्णकुमार सन्मुखराव यांच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.