Latur Minor Girl Molestation News Saam Tv
महाराष्ट्र

Latur : अल्पवयीन मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेलं, मांडीवर बसवून नको ते केलं; लातूरमधील धक्कादायक घटना

Latur Minor Girl Molestation News : लातूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्यात नेवून मुलीसोबत अश्लील चाले केले. आरोपीला अटक करण्यात आली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Alisha Khedekar

  • लातूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • आरोपीने पीडितेला जबरदस्ती करत जनावरांच्या गोठ्यात नेलं

  • मांडीवर बसवून अश्लील कृत्य

  • पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या

संदीप भोसले, लातूर

Latur Kingaon Minor Girl Physically Assault लातूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी नराधम तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी ३ मार्च रोजी घडली. लातूरच्या किनगाव पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाने अल्पवयीन मुलीला धमकावले आणि तिला ओढत जनावरांच्या गोठ्यात नेले. आरोपी तरुणाने तिला वाईट हेतूने तिथे नेले.

तिला मांडीवर बसवून तिच्याशी अश्लील चाळे केले. आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला, तसेच तिला जीवे मारण्याची भीती दाखवून चुकीची कृत्ये करण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेनंतर पीडितेने कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पीडितेच्या आईने किनगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि पोक्सो कायदा २०१२ च्या कलम ८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता कालवश, अभिनेत्याने लिहिली हृदयद्रावक पोस्ट

Bank Jobs: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २५० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; पगार १.२० लाख; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : रोहित पवार आज सीआयडी कार्यालयात जाणार

IAF Sukhoi Su-30MKI : मोठी बातमी! उड्डाण घेताच सुखोई विमान कोसळले, मराठी फायटर पायलटचं निधन

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट; वाइल्डकार्ड संकेत ठरला 'किंग', राखी सांवतला दिली कॅप्टनशिप

SCROLL FOR NEXT