Latur Crime 32-Year-Old Man Abducted And Murdered; Four Booked AI Image
महाराष्ट्र

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Maharashtra Latur Crime News : लातूरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून ३२ वर्षीय माधव उर्फ नितीन संगमेचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • लातूर शहरात 32 वर्षीय माधव उर्फ नितीन संगमे याचे अपहरण करून हत्या

  • आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हत्या

  • लाठ्या-काठ्यांनी केलेल्या गंभीर मारहाणीत नितीनचा मृत्यू

  • लातूर पोलिसांकडून सुरू आहे

लातूर शहरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके या चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव माधव उर्फ नितीन संगमे (वय 32) असे आहे.या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माधव उर्फ नितीन संगमे याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून कन्हेरी चौक परिसरातून नितीनचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेण्यात आले.

तेथे आरोपींनी नितीनला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. गंभीर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनैतिक संबंधाच्या संशयातून एवढे टोकाचे पाऊल का उचलण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Latur Crime News )

तसेच या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास लातूर पोलीस करत असून, आरोपींची चौकशी आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: मोठी बातमी! दुष्काळामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वाहनाला लागली अचानक आग

Accident News : महामार्गावर विचित्र अपघात! भरधाव कारची दुचाकीला धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

Anushka Sharma : अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? विराटसोबत मुंबईत स्पॉट, 'त्या' VIDEO नंतर जोरदार चर्चा सुरू

Maharashtra MLC Election Results 2026: २३ तासांपासून मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर; मविआ ३ तर महायुती २ जागांवर आघाडीवर

SCROLL FOR NEXT