Covaxin Vaccine Saam Tv
महाराष्ट्र

Covaxin Vaccine: लातुरात कोव्हॅक्सिनचा तुटवडा, एक दिवस पुरेल इतकाच साठा

लातूर जिल्ह्यामध्ये कोव्हिशील्डचे 1 लाख 51 हजार 90 डोस शिल्लक आहेत.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : राज्यामध्ये कोरोनाचे संकट गडद होत असतानाच राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध लादले आहेत. नागरिकांना दोन लसी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. आता सार्वजनिक ठिकाणी वावर करताना दोन्ही लसींचा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आता सोबत बाळगने सक्तीचे करण्यात आले आहे (Latur Covaxin Vaccine Shortage Vaccine Stock Is Only Enough For One Day).

लातूर जिल्ह्यामध्ये कोव्हिशील्डचे 1 लाख 51 हजार 90 डोस शिल्लक आहेत. तर कोव्हॅक्सिनचे 26 हजार 575 डोस शिल्लक आहे. कोव्हॅक्सिनचे डोस केवळ आजच्या दिवसापूरतेच उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हणमंत वडगावे यांनी दिलीये.

लातूर जिल्ह्यात दहा तालुक्यासह लातूर शहरात तीन ठिकाणच्या केंद्रांतर्गत विविध ठिकाणी लसीकरण सुरु आहे यामध्ये कोव्हिशील्डचे 1 लाख 51 हजार 90 तर कोव्हॅक्सिनचे 26 हजार 555 शिल्लक आहेत. जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लशीचा (Corona Vaccine) साठा केवळ आजच्या दिवस पुरेल इतकाच उपलब्ध असल्याने कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिनच द्यावी असे निर्देश आहेत. परंतु तात्काळ कोव्हॅक्सिनचा पुरवठा झाला नाही, तर 15 ते 18 वयोगटातील विशेष लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कोव्हॅक्सिन लशीची मागणी केली असून लवकरच लस उपलब्ध होईल असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT