CCTV FOOTAGE Saam TV
महाराष्ट्र

CCTV FOOTAGE : भरधाव कार थेट हॉटेलमध्ये शिरली, दोघांचा जागीच मृत्यू , 3 जण जखमी

Latur News : भरधाव करा औसा येथून लातूरच्या दिशेने जात होती. यावेळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Ruchika Jadhav

संदिप भोसले

Latur Accidents News :

लातूरमध्ये (Latur ) अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक कार थेट समोर असलेल्या हॉटेलमध्ये शिरली. कार फार वेगात असल्याने यामध्ये काही जण कारखाली चिरडले गेले. तसेच ३ जण जखमी असल्याचे समजत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. लातूर सोलापूर महामार्गावरील औसा येथे ही थरारक घटना घडलीये. अपघाताचा थरार हॉटेलसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भरधाव करा औसा येथून लातूरच्या दिशेने जात होती. यावेळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तीन व्यक्तींना कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यात तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. तीनही व्यक्तींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात

शनिवारी सकाळी समृद्धी महामार्गावर देखील अपघाताची अशीच एक घटना घडली. सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा समावेश आहे. तसेच रितेश भानादकर (वय २४) आणि आशिष सरवदे (वय ३७)अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

SCROLL FOR NEXT