Latur Accident  Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघाताचा थरार; जेसीबी चालकाने १० ते १२ जणांना उडवलं, एक ठार, VIDEO

Latur drunk and drive : लातूरमध्ये भीषण अपघाताचा थरार घडला आहे. लातूरमध्ये जेसीबी चालकाने १० ते १२ जणांना उडवलं आहे. या भीषण अपघातात एक ठार जागीच ठार झाला आहे.

Vishal Gangurde

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

लातूर : राज्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता लातूरमध्ये मद्यधुंद वाहन चालकाने १० ते १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. लातूरच्या कन्हरी चौकात सोमवारी रात्री उशिरा ही अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. लातूरमध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून चालकाने १० ते १२ जणांना उडवलं आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जालिंदर मुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नागरिकांनी जेसीबी चालकाला पोलिसांच्या हवाली केलं आहे. या मद्यधुंद वाहनचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

लातूरच्या कन्हरी चौकात मद्यधुंद चालक जेसीबी चालवत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक बेदरकारपणे जेसीबी चालवताना दिसत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जेसीबी चालकाने रस्त्यावर दिसणाऱ्या पादचाऱ्यांना उडवण्याचं काम केलं. या जेसीबी चालकाने तब्बल १० ते १२ जणांना उडवलं.

या चालकाच्या कृत्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वेगाने जेसीबी चालवताना इतर वाहन चालकाला थांबण्यास सांगत आहे. मात्र, इतर वाहन चालकांचं न ऐकता जेसीबी चालक वेगाने गाडी चालवत आहे. जेसीबी चालकामुळे रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT