Latur Accident CCTV Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident: तोच रस्ता, तीच जागा, तसाच थरार; लातूर-नांदेड महामार्गावर तिसरा भयंकर अपघात, VIDEO

Latur Accident CCTV: लातूर -नांदेड महामार्ग मृत्यूचा चौफुला बनत चालला आहे. या महामार्गावर एकाच ठिकाणी सलग तिसरा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूर -नांदेड महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे ३ दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला कारची जोरदार धडक दिली. यापूर्वी याच ठिकाणी दोन भीषण अपघात झाले होते. यामध्ये एकाचा मृत्यू तर चार जणांना कायमचे अपंगतत्व आले होते.

लातूर -नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे अपघाताचे सत्र सुरूच आहे. हा महामार्ग मृत्यूचा चौफुला होत चालला आहे. दुचाकी आणि कारचा भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. ८ दिवसांपूर्वीच याच ठिकाणी बस उलटून भीषण अपघात झाला होता. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघात इकता भीषण होता की दुचाकीवरील दोघेही जण उंच उडून रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला.

आतापर्यंत याच ठिकाणी तीन मोठे अपघात झाले असून या अपघातात ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुचाकी वरील जखमी व्यक्तीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मागच्या एक महिन्यापूर्वीच याच ठिकाणी एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. या अपघातात या डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला होता.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बससमोर दुचाकीस्वार आल्याने बस उलटली. या अपघातात बसमधील ३६ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. यामधील तीन प्रवाशांना कायमचं अपंगत्व आले. त्यामुळे जिल्हातून जाणाऱ्या महामार्गावरील सतत अपघात होणारे ब्लॅक स्पोट शोधून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT