खासदार गावितांचा भाजप उमेदवारांसाठी प्रचार Saam Tv
महाराष्ट्र

धडगाव नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, खासदार गावितांचा भाजप उमेदवारांसाठी प्रचार

धडगाव वडफळ्या रोषमाळ बुद्रुक नगरपंचायती साठी 21 डिसेंबर रोजी मतदान (Vote) होणार आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : धडगाव वडफळ्या रोषमाळ बुद्रुक नगरपंचायती साठी 21 डिसेंबर रोजी मतदान (Vote) होणार आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) तिन्ही पक्षांनी निवडणुकीत उडी घेतल्याने नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. - Last day of Dhadgaon Nagar Panchayat election campaign MP Hina Gavit's campaign for BJP candidates

भाजप उमेदवारांसाठी आज खासदार डॉक्टर हिना गावित (Hina Gavit) यांनी प्रचार केला. घरोघरी जाऊन, रॅली तसेच प्रचार सभा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करुन सेवेची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेच्या वतीने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मंत्री अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनीही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.

हेही वाचा -

काँग्रेसच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार करण्यात आला आहे. धडगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत असून बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे 21 डिसेंबरला मतदान होऊन 22 डिसेंबरला मतमोजणी होणार होती; परंतु ओबीसी आरक्षणामुळे मतमोजणीची तारीख 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT