नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून ड्रग्सची मोठी तस्करी उघड!
नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून ड्रग्सची मोठी तस्करी उघड! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून ड्रग्सची मोठी तस्करी उघड!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर: महाराष्ट्रामध्ये NCBची अंमली पदार्थ जप्त करण्याची मोहीम सुरूच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये ड्रग्जवर एनसीबीची कारवाई सुरू आहे. काल (ता. १५) ला गुजरात मधून 120 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, याचप्रकारे काल महाराष्ट्रमध्ये जळगाव मधून मुंबई एनसीबीने 1500 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. यासोबतच एनसीबीने दोघांनाही अटक केली होती. राज्यातील ड्रग्स प्रकरणात रोज कारवाई होत असताना पोलीस देखील कडेकोट सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. असे असतानाच नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी गांजाची मोठी तस्करी उघड केली आहे. यात 38 किलो अंमली पदार्थ (गांजा) जप्त करण्यात आला असून त्याची किंमत साडे तीन लाख रुपये पेक्षा जास्त आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावर विशाखा पट्टणम - नवी दिल्ली समता एक्सप्रेस आली होती. तेव्हा रात्रीच्या वेळी वस्तीवर असणार रेल्वे पोलिसांनी चेकिंग करत असताना एका डब्यातून गांजाचा वास आल्याने पोलिसांनी कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या बाथरूमच्या वर गांजाचे पॅकेट ठेवले होते. मात्र पोलिसांनी विचारपूस केली असतां कोणीही त्यावर आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी ते उघडले असता त्यात 38 किलो गांजा मिळून आला आहे, ज्याची बाजारात किंमत साडे तीन लाख रुपये पेक्षा जास्त आहे.  

यावर कोणीही आपला हक्क सांगितलं नसल्याने पोलिसांनी तो जप्त केला. मात्र विशाखापट्टणम वरून दिल्ली कडे तो गांजा कोण पाठवत होत आणि ही सगळी तस्करी कोण करत होत याचा शोध घेणे सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

Akola News : शिक्षकाचा शॉक लागून मृत्‍यू; शेतात भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना

Saleel Kulkarni : "एकच चष्मा लावून सगळे चित्रपट किंवा माणसं बघता येत नाही"; सलील कुलकर्णीची ‘नाच गं घुमा’बद्दलची पोस्ट चर्चेत

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर काही तासांतच दोन मोठे अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

SCROLL FOR NEXT