मुंबई: राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचा मुद्दा तापला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे की सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा दिल्लीच्या हवेच्या दर्जेपेक्षा अधिक खराब होता.
हे देखील पहा-
समुद्रावरून येणारे वारे, वाऱ्याचा वेग कमी होणे आणि अनेक वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी बनली आहे. दक्षिण मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सोमवारी 345 अंकांवर पोहोचला होता. तर सोमवारी दिल्लीतील हवेचा दर्जा 331 होता. तर, मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील कुलाबा येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आढळून आले. यानंतर माझगावचा क्रमांक लागत आहे. येथे हवेचा दर्जा निर्देशांक 325 असल्याचे आढळून आले. तिसर्या क्रमांकावर असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तर, येथे हवा गुणवत्ता निर्देशांक 314 आणि मालाडमध्ये 306 वर आढळला आहे. तर अंधेरीतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 259 असल्याचे आढळून आले.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता तर खालावत चालली आहे, पण हिवाळ्यात उष्णताही जाणवत आहे. मुंबईत दिवसा तापमानात वाढलेले असते. मुंबईत दिवसा तापमान 35.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमान वाढल्याने हवेच्या गुणवत्तेतही फरक दिसून येत आहे. रविवारीसुद्धा हवेची गुणवत्ता 245 AQI नोंदवली गेली आहे. दिवाळीच्या दिवशीही मुंबईतील हवेची गुणवत्ता इतकी खराब नोंदवली गेली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 AQI नोंदवण्यात आली होती.
वातावरणातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या संस्थेच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उष्ण वाऱ्यांचा प्रवाह उत्तर-पश्चिम दिशेला सुरू आहे. त्यामुळे शहरातील तापमानात वाढ होत आहे. 21 आणि 22 नोव्हेंबरपर्यंत तापमान असेच राहील. त्यानंतर तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. कर्नाटकच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.