राज्यात बाल पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात मोठी वाढ; 105 जणांना अटक! Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात बाल पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात मोठी वाढ; 105 जणांना अटक!

महाराष्ट्र पोलिसांनी Police अल्पवयीन मुलांची अश्लील चित्रफित Pornography तयार करणे आणि त्या इंटरनेटवर अपलोड करणाऱ्या आरोपींच्या नुसार गेल्या १८ महिन्यात १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: महाराष्ट्र पोलिसांनी Police अल्पवयीन मुलांची अश्लील चित्रफित Pornography तयार करणे आणि त्या इंटरनेटवर अपलोड करणाऱ्या आरोपींच्या नुसार गेल्या १८ महिन्यात १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यामुळे २१३ गुन्हे दाखल केले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली. महाराष्ट्र सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय शिंत्रे यांनी सांगितलं आहे की, हे गुन्हे गेल्या १८ महिन्यांत नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB द्वारा जाहीर केलेल्या ‘टिपलाईन रिपोर्ट’ च्या आधारे नोंदविण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या राष्ट्रीय बेपत्ता आणि पिडीत बालकांच्या केंद्रामार्फत बाल पॉर्नोग्राफिची ‘टिपलाईन रिपोर्ट बनवण्यात येत असते. सोशल मीडिया, विविध सर्च इंजिन, विविध वेबसाईट आणि इतर सोशल माध्यमांवर कटाक्ष नजर ठेऊन हा रिपोर्ट बनवण्यात येतो. सांगण्यात आले होते की, NCMEC च्या FBI च्या मदतीतून नियमितपणे भारताच्या NCRB सोबत एक रिपोर्ट दिला जातो. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा हा रिपोर्ट देण्यात येतो.

माहितीनुसार, या रिपोर्टमध्ये विशेष IP अड्रेस आणि त्या त्या ठिकाणांची नावे असतात. जिथे अश्लील साहित्याचा वापर केला जातो या ठिकाणाची माहिती असते. या माहितीच्या आधारे सायबर पोलीस तपास करतात आणि आरोपींचा शोध लावला जातो. पोलिसांच्या मते, महाराष्ट्र सायबरने राज्यात बाल पोर्नोग्राफीवर लगाम लावण्यासाठी सन २०१९-२० मध्ये ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ सुरु केले होते. ११,१२२ ‘टिपलाईन रिपोर्ट’मधून सर्वात जास्त ५,६९९ रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आली आहेत. त्यानंतर मुंबई ४४९६, ठाणे ६३४, नागपूर ३०२ आणि औरंगाबाद ९० तसेच अन्य ठिकाणी पाठवण्यात आली.

या रिपोर्टच्या आधारे तसेच पोलिसांनी सांगितलं की, सर्वात जास्त म्हणजे तब्बल ३८ गुन्हे नागपूर पोलिसांनी नोंद केले आहेत. पोलिसांच्या मते, जिथून बाल पॉर्नोग्राफी कन्टेन्ट तयार करून प्रक्षेपित केल जात आहे त्या जिल्ह्यचा शोध महाराष्ट्र सायबर घेत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT