Nanded Saam
महाराष्ट्र

Nanded News: जमिनीच्या जागेवरून वाद, महिला सरपंच अन् त्यांच्या पतीला शेतावरच बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

Female Sarpanch and Husband Attacked Over Land Dispute: जमिनीच्या जागेच्या वादावरून महिला सरपंचासह त्यांच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या इंजेगावात घडली आहे.

Bhagyashree Kamble

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

जागेच्या वादावरून महिला सरपंचासह त्यांच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच जणांकडून ही मारहाण करण्यात आली असून, मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरलही करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नांदेडच्या फत्तेपूर शिवारात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडच्या इंजेगावात नागनाथ नारायण पंचलिंगे यांच्या आईच्या नावावर शेत जमीन आहे. ही शेत जमीन दुसऱ्याच्या नावाने फेरफार लावल्याचा आरोप नागनाथ पंचलिंगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात देखील अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही काही लोकांनी त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी नागनाथ पंचलिंगे आणि त्यांचे पती महिला सरपंच त्या शेतावर गेल्या होत्या. महिला सरपंच आणि त्यांचे पती शेतावर गेले असता, त्यांच्यावर ४ ते ५ जणांनी मिळून प्राणघातक हल्ला करत मारहाण केली. काहींनी या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला.

या प्रकरणात पंचलिंगे यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात खोटा फेरफार केल्याबद्दल अनेक वेळा तहसीलदारांकडे कारवाईची मागणी केली होती, पण त्या मागण्यांकडे तहसीलदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागनाथ पंचलिंगे यांनी केला आहे. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

SCROLL FOR NEXT