Hyderabad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Lalbaug Crime News: 'ती' मालिका पाहिली अन् आईचे तुकडे...; त्या कृत्याबद्दल मुलीनेच केला धक्कदायक खुलासा

२३ वर्षीय तरुणीची चौकशी सुरू असताना तपासात समजले आहे की, तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर क्राईम व्हिडिओ आणि सिरिअल पाहत होती.

Ruchika Jadhav

Crime News: लालबाग येथे एका २३ वर्षीय मुलीने आपल्या आईची क्रूरपणे हत्या केली. आईच्या मृतदेहाचे तिने तुकडे केले होते. मृतदेहाचा कुजलेला वास येऊ नये यासाठी तिने वेगवेगळे उपाय केले. मात्र तिचं हे भांड पोलिसांनी उघडं पाडलं आहे. आता या प्रकरणी वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मृत्यूचं खरं कारण काय यासाठी पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यातच मुलीची देखील कसून चौकशी सुरू आहे. तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर शोधत असताना पोलिसांच्या हाती एक वेगळी माहिती लागली आहे.

२३ वर्षीय तरुणीची चौकशी सुरू असताना तपासात समजले आहे की, तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर क्राईम व्हिडिओ आणि सिरिअल पाहत होती. तिने क्राईम पेट्रोलचे सर्व एपीसोड पाहिलेत. या सर्वांमधूनच मी आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला असं, या तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आणखीन एका तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेश येथून या युवकाला चौकशीसाठी मुंबईला आणण्यात आले आहे. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून लालबाग परिसरात सॅन्डवीच विकत होता. त्याची आणि आरोपी २३ वर्षीय मुलगी रिंकल जैन या दोघांची मैत्री असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT