Lakhan the bull after winning a Fortuner SUV and Silver Mace at the Double Hind Kesari bullock cart race in Sangli.  saam tv
महाराष्ट्र

वा रे लखन वा! डबल हिंद केसरी लखन बैलानं जिंकली फॉर्च्युनर आणि चांदीची गदा

Lakhan Champion Bull Wins Fortuner Car: लखन नावाच्या दमदार बैलाने स्पर्धेत फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तुमचा विश्वास बसणार नाही पण लखन नावाच्या लखपती बैलांना ही करामत करून दाखवलेली आहे. थोड्याच दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयासमोर या लखपती लखन आणि त्याच्या मालकाचा सत्कार होणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

  • लखन बैलाने राज्यस्तरीय डबल हिंद केसरी स्पर्धेत फॉर्च्युनर कार आणि चांदीची गदा जिंकली आहे.

  • या स्पर्धेत राज्यभरातून हजारो बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता.

  • लखन आणि त्याच्या मालकाचा मुंबई मंत्रालयात सत्कार होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येथील करोडी येथील लखन या दमदार बैलाने सांगलीत पार पडलेल्या डबल हिंद केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत फॉर्च्युनर कार जिंकून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव राज्यभर गाजवले. चंद्रहार पाटील यांच्या आयोजनाखाली तासगाव-कौड्याचा मळा येथील तब्बल ५०० एकरांच्या विशाल मैदानावर झालेल्या या भव्य स्पर्धेत राज्यभरातून कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, नाशिक आदी भागांतील हजारो बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. (Lakhan Champion Bull Wins Fortuner Car In Bullock Cart Double Hind Kesari Race)

लाखो शौकिनांच्या उपस्थितीत रंगलेल्या या शर्यतीत करोडीचा लखन आणि कळमनुरीचा सर्जा या दमदार जोडीने आपल्या वेग आणि समन्वयाच्या जोरावर मानाचा फॉर्च्युनर कार व चांदीची गदा हा बहुमान पटकावला. याचा बक्षीस वितरण सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयासमोर होणार आहे.

या जोडीने हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल या नामांकित बैलजोड्यांनाही मागे टाकत विजय मिळवला. लखन व सर्ज्याने या पूर्वीही अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. करोडी येथील सर्जेराव पाटील चव्हाण यांचा लखन हा आधीच तीन वेळा ‘हिंद केसरी’ किताब पटकावलेला आहे, तर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील साईनाथ पाटील यांचा सर्जा हाही तीन वेळा ‘हिंद केसरी’ ठरलेला आहे.

सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत या जोडीने प्रारंभापासूनच आपल्या गतीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अंतिम फेरीत अप्रतिम झेप घेत पहिला क्रमांक मिळवला.लखनला अडीच वर्षांपूर्वी गजानन काळे यांच्याकडून ११ लाख ५५ हजार रुपयांत खरेदी करण्यात आले होते.

सध्या लखनने २०० पेक्षा अधिक शर्यतींमध्ये विजय मिळवला असून, तो विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध स्पर्धांमध्ये चमकला आहे. लखनच्या दैनंदिन खुराकात पाच लिटर गिर गायचे दूध, काजू, बदाम, गावरान अंडी यांचा समावेश आहे. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते आणि स्पर्धांकरिता विशेष पिकअप वाहनातून ने-आण केली जाते. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या छत्रपति संभाजीनगरच्या करोडीचा लख महाराष्ट्राचा किंग ठरला. त्यानं फॉर्च्यूनर अन् चांदीची गदा जिंकत मैदान मारलंय. आता सत्काराला येताना तो मुंबईतही दिमाकात मिरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडचणीतून वाट काढावी लागणार; वृश्चिकसह ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचं पाक कनेक्शन उघड? डॉक्टर शाहीना हल्ल्याची मास्टरमाईंड?

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Solapur Municipal Corporation: निवडणूक आरक्षण जाहीर; दिग्गजांना धक्का,आरक्षणामुळे वाढल्या अडचणी

Skin Care: वारंवार चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्स वापरणं आहे धोकादायक, होऊ शकतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT