Ladki Bahin Yojna SaamTv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवर सरकारी तिजोरीतून आत्तापर्यंत किती खर्च?

Total Funding Of Ladki Bahin Yojna : महायुती सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल सध्या चर्चा रंगणार आहेत. निधी अभावी ही योजना बंद करावी लागेल असं बोललं जात असतानाच महायुती सरकारने आत्तापर्यंत या योजनेवर केलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मतदान केल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आत्तापर्यंत या योजनेतून २.५ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे.

राज्यातील २.६ कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. पैकी २.३ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळाले आहेत. तर १६ लाख महिलांच्या खात्यासोबत आधार लिंक नाही, त्यामुळे लाभ पोहचला नाही. विधानसभा निवडणुकीआधी १७ हजार कोटी रूपये सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले.

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने आतापर्यंत ६ महिन्यांत सुमारे १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. महायुती सरकारने २०२४ - २०२५ देखील १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली.

या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. येणाऱ्या वर्षासाठी केलेल्या तरतुदीत पैसे कमी पडतील म्हणून पुरवणी मागणीनुसार सन २०२४-२०२५ साठी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी २५ हजार कोटी अशाप्रकारे एकूण ३५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे.

दरम्यान, राज्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सर्वाधिक पुण्यात आहेत. 20.8 लाख लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीआधी एकूण 21 लाख 11 हजार 946 अर्ज आले होते. त्यापैकी 20 लाख 84 हजार 364 अर्ज स्वीकारण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT