Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची ₹१५०० कडे पाठ, पडताळणीच्या कटकटीमुळे 'या' योजनेसाठी अर्ज

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्जांची पुन्हा पडताळणीदेखील केली जात आहे. त्यामुळे महिलांनी कंटाळून संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडक्या बहिणींनी केवायसी करणे अनिवार्य

लाडक्या बहिणींचा संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. त्यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. दरम्यान, अनेक महिलांना गेल्या काही महिन्यांपासून योजनेचा व्यवस्थित लाभ मिळत नाहीये. त्यामुळे सततच्या कटकटीला कंटाळून महिलांनी आता संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केला आहे.

लाडकी बहीण योजनेत महिला फक्त एकाच योजनेचा लाभ घेभ शकतात. लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी निराधार योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, अनेक महिलांनी संजय गांदी निराधार योजनेतून नाव काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. त्यानंतर आता पडताळणी, केवायसी या सर्व प्रोसेसला कंटाळून त्यांनी पुन्हा संजय गांधी निराधार योजनेसाठी लाभ घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक महिला वयोमर्यादेत बसत नाहीत तर अनेक कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहेत. यामुळे ४० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेत महिलांना मागील काही महिन्यांपासून योजनेचा नियमित लाभ मिळत नाहीये. अनेक महिन्यांपासून योजनेचा लाभ पुढे ढकलला जात आहे.त्यामुळे महिला कंटाळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा संजय गांधी निराधार योजनेसाठी पुन्हा अर्ज करत आहेत.

ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत (Ladki Bahin Yojana E KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. महिलांना दोन महिन्यात केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT