Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

Uday Samant On Ladki Bahin Yojana: मंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. २१०० रुपयांबाबत वर्किंग सुरु आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आजपासून एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांना १५०० रुपये दिले जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वसन महायुती सरकारने दिले होते. यानंतर आता मंत्री उदय सामंतांनीदेखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.

उदय सामंत काय म्हणाले? (Uday Samant On Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१००० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ, असं महायुती सरकारने सांगितले. यानंतर आता मंत्री उदय सामंतांनीदेखील महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याबाबत वर्किंग सुरु आहे. ज्यावेळी यासंदर्भात निर्णय घेण्याची योग्य वेळ येईल, त्यावेळी महाराष्ट्र नक्की निर्णय घेईल. महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या बाबत नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात (Ladki Bahin Yojana April Installment)

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या २-३ दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. ज्या महिला अपात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे आलेत की नाही ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मोबाईल अॅपवर जाऊन पैसे आले की नाही ते तपासू शकतात. तसेच ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊन १५०० रुपये जमा झालेत की नाही ते चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

SCROLL FOR NEXT