Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना पुढचा एकही हप्ता मिळणार नाही; ₹१५०० कायमचे बंद, तुमचं नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही लाभार्थी महिलांचे लाभ बंद होणार आहेत. यामध्ये तुमचा समावेश तर नाही ना हे चेक करा.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या महिलांना कधीच मिळणार नाही योजनेचा हप्ता

ई केवायसी करणे अनिवार्य

लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिला लाभ घेत आहेत. दरम्यान, आता लवकरच ऑक्टोबरचा हप्तादेखील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान, लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहेत. आता या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ते जाणून घ्या.

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ (These Women Will not Get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषांचे पालन करणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

ई केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभ कायमचा बंद (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)

या निकषांसोबतच आता महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तुम्हाला केवायसी पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीत. फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशातून केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी करत आहेत. दरम्यान, यातून जवळपास ४० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे लाखो महिलांचे लाभ याआधीच बंद झाले आहे. यानंतर केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

अमेरिकेकडून 'कापूस'कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT