Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: आठवडा उरला! खात्यात १५०० कधी येणार? मे महिन्याच्या हप्त्याची लाडकींना प्रतिक्षा

Ladki Bahin Yojana May Month Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

मे महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. तरीही अद्याप लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचे १५०० रुपये आले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु या योजनेत मे महिना संपत आला तरीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मात्र, आता येत्या आठवड्याभरात पैसे जमा केले जाऊ शकतात. येत्या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

८ दिवसांत पैसे आले नाही तर (Ladki Bahin Yojana May Month Installment)

लाडक्या बहि‍णींना ८ दिवसात खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे. परंतु जर असे झाले नाही तर कदाचित पुढच्या महिन्यात हप्त्यात जमा होऊ शकतो. पुढच्या महिन्यात जून आणि मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर अधिकृत घोषणा झाली तरच महिलांना पुढच्या महिन्यात पैसे येऊ शकतात.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. अनेक बोगस अर्ज आल्यानंतर पुन्हा पडताळणी करणे ठरवले आहे. यामध्ये ज्या महिला निकषाबाहेर आहेत किंवा खोटी माहिती देऊन ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे या महिन्यात काही महिलांचे अर्ज बाद केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT