Ladki Bahin Yojana List of ineligible sisters SaamTV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : पैसे वसुलीसाठी अपात्र लाडकी बहिणींची लिस्ट तयार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ladki Bahin Yojna : अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले ९ हजार रुपये वसूल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. कारण, आताची लिस्ट आलीय त्यामध्ये तब्बल ५ लाख महिला अपात्र ठरल्यायत.

संदीप चव्हाण

मुंबई : लाडकी बहिणींसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. निकष डावलून जर लाडक्या बहिणींनी पैसे घेतले असतील तर ते पैसे परत घेतले जाणार असा दावा केला जातोय. खरंच पैसे सरकार वसूल करणार का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं ते पाहुयात

अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले ९ हजार रुपये वसूल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. कारण, आताची लिस्ट आलीय त्यामध्ये तब्बल ५ लाख महिला अपात्र ठरल्यायत. याच अपात्र लाडकींकडून प्रत्येकी ९ हजार रुपये वसूल करणार असल्याचा दावा केल्यानं लाडकींच्या मनात भीती निर्माण झालीय. कारण, आतापर्यंत मिळालेले पैसे अनेकांनी वापरलेही. तर काहींना पैसे परत देणं शक्यही नाही. मात्र, या दाव्यात तथ्य आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं.अपात्र बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची खरी माहिती लाडकींना देणं गरजेचं आहे. राज्यभरात अडीच कोटी लाडकींना लाभ मिळतोय. त्यात ५ लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरल्यायत. त्यामुळे या सगळ्यांकडून पैसे परत घेणार का? आतापर्यंत कोणत्या लाडकी अपात्र ठरल्यायत पाहुयात.

कोणत्या लाडकी अपात्र?

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी

वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या लाडकी

कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी

नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी

काहींनी तर स्वेच्छेनं अर्ज मागे घेतलाय. तर काही अजूनही लाभ घेत आहेत. छाननीत ज्या अपात्र ठरत आहेत त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. मात्र, खरंच पैसेही वसूल करणार का? याची माहिती मंत्री आदिती तटकरे देऊ शकतात. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवली.

व्हायरल सत्य; साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकी योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाडकींचे अर्ज बाद होणार. अपात्र लाडकींना आता पैसे मिळणार नाहीत. दिलेले ९ हजार रुपये परत घेणार ही अफवा असून मंत्री आदिती तटकरेंनी पैसे परत घेणार नसल्याचं सांगितलं. ५ लाख अपात्र लाडकींच्या खात्यात पैसे गेल्यानं सरकारला साडेचारशे कोटींचा फटका बसलाय. मात्र, लाडकींकडून पुन्हा पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT