Ladki Bahin Yojana SaamTv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा डंका! महाराष्ट्र, झारखंडनंतर 'या' राज्याने लागू केली योजना, या तारखेपासून करता येणार अर्ज

Delhi Government News : विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारी लाडकी बहीण योजना आता आणखी एका राज्यात लागू करण्यात येणार आहे.

Saam Tv

राज्यात महायुती सरकारच्या विजयात महत्वाचा वाटा असलेल्या लाडकी बहीण योजनेचा डंका आता दिल्लीत देखील वाजणार आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यांनंतर आजपासून दिल्लीतील लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या योजनेने गेमचेंजिंग फॅक्टर म्हणून कामं केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली विधानभा निवडणुकांच्या अगोदरच दिल्लीतील केजरीवाल सरकारने आता लाडकी बहीण योजना लागू केली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

आम आदमी पार्टीचे संचालक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही मोठी घोषणा केली. याबद्दल कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर लागलीच आजपासून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

राजधानी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. यातच महिलांना दरमहा 1 हजार रुपये देण्याची सर्वात मोठी घोषणा देखील केजरीवाल सरकारने केली आहे.

विशेष म्हणजे आजपासून महिलांना ते 1 हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी महिलांना आजपासून अर्ज करता येणार आहेत. तसंच दिल्लीत जर पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर या रक्कमेत वाढ करून 2100 रुपये करण्यात येणार आहेत, असं आश्वासनही केजरीवाल यांनी दिलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीतही लाडक्या बहीणींचा डंका वाजताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT