Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladik Bahin Yojana: लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत; शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा,महायुतीचं आश्वासन हवेतच

Sanjay Shirsat Statement On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींबाबत मोठी बातमी. महायुती सरकारच्या आश्वासनानुसार 2100 चा वाढीव हफ्ता कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतिक्षा आहे. मात्र 2100 रुपये मिळणार नाहीत अस खुद्द मंत्री महोदयांनीच म्हटलंय.

Girish Nikam

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा १५०० रुपयांचा दहावा हफ्ता बँक खात्यात जमा झाला आहे. मात्र महायुती सरकारच्या आश्वासनानुसार वाढीव २१०० रुपयांचा हफ्ता कधी मिळणार ? याची प्रतिक्षा कायम आहे. या पार्श्वभूमिवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विधानानं लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत, अशी वस्तूस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली आहे.

मात्र 1500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय राज्याच्या उत्पन्नाच्या सुमारे १० टक्के निधी केवळ लाडकी बहिण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर परीणाम होतोय. मंत्री संजय शिरसाट यांनीही सामाजिक खात्याचा ४०० कोटींचा निधी लाडकीकडे वळवल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे निधी मिळत नसल्यानं महायुतीत धुसफूस सुरु आहे.

सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असली तरी अर्थसंकल्पातही २१०० रुपयांची घोषणा केलेली नाही. सरकारची तिजोरी रिकामी असल्यानं लाडकीला वाढीव हप्ता देणे शक्य नाही. मात्र हेच वास्तव आता खुद्द मंत्रीच बोलून दाखवतायेत. त्यामुळे काटेकोर पडताळणीतून लाडकीची संख्या आणखी घटणार आणि १५०० रुपयांवरच लाडकीला समाधान मानावं लागणार आहे. एव्हढं मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

SCROLL FOR NEXT