Siddhi Hande
प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात काळ्या वाटाण्याची उसळ ही बनवली जाते. काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
सर्वात आधी तुम्हाला काळे वाटाणे भिजत घालायचे आहेत.
सर्वात आधी पॅनमध्ये तेल टाका. त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला टॉमेटो टाकून परतून घ्या.
त्यात एक चमचा लाल तिखट, धणे-जदिरे पूड, हळद, मीठ टाकून मिक्स करा.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, वाटीभर भिजवलेले काळे वाटाणे बारीक करा. यात थोडं पाणी टाका.
यानंतर हे मिक्सरमधील वाटण कांद्याच्या फोडणीत टाका.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका. या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेले काळे वाटाणे टाका.
यावर कसुरी मेथी, कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करा. तुम्ही ही उसळ भाकर, चपातीसोबत खाऊ शकतात.