Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या नावावर बनावट बँक खाती, सरकारी तिजोरीवर बोगस लाडकींचा डल्ला

Maharashtra Government: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या नावे बनावट बँक खाती असून बोगस लाडकींकडून लाखोंची लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Priya More

गिरीश निकम, साम टीव्ही

'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या नावानं लाखो रुपये लाटण्यात आलेत. लाडक्या बहिणींच्या नावे बनावट बँक खाती असून बोगस लाडकींकडून लाखोंची लूट केली जात आहे. सरकारी तिजोरीवर बोगस लाडक्या डल्ला मारत आहेत. त्याची कबुलीच सरकारने दिलीय. मात्र हा लुटीचा गोरखधंदा कसा सुरु होता? पाहूयात...

एक वर्ष पूर्ण होत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता लाडकीच्या नावानं बनावट बँक खाती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे मान्य केलंय. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी बनावट बँक खात्याबाबत माहिती दिली.

जुहू पोलिसांच्या तपासात बनावट बँक खाती उघडकीस आले आहे. 104 बनावट बँक खाती उघडकीस आली आहेत. या बनावट लाडकींनी सरकारचे 19 लाख 43 हजार रुपये लाटले आहेत. मानखूर्द, देवनार, धारावी येथील शेकडो महिलांची फसवणूक केल्याची तक्रार आली होती. राज्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये 2, साताऱ्यात 2, सोलापूरात 1, सोलापूर ग्रामीणमध्ये 1, नांदेडमध्ये 1 या ठिकाणी बोगस लाडकी बहिणींची बँक खाती आहेत.

मुंबईतील या प्रकरणातील सर्व बँक खाती आणि खातेधारक खरे आहेत. आरोपींनी खातेधारकांना 1000 रुपये देऊन त्यांची खाती वापरली. पोलिसांनी या घोटाळ्यातील रक्कम गोठवली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार प्रतीक पाटील नावाची व्यक्ती फरार आहे. आधीच लाडकीचा भार सरकारला डोईजड झाला आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना अशा फसवणुकीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान सरकार समोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

SCROLL FOR NEXT