Ladki Bahin Yojana  x
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Ladki Bahin Yojana News : तब्बल 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांची योजनेतील घुसखोरी उघड झाली आहे. या बोगस भावांनी सरकारी तिजोरीतून किती पैसे लाटले? त्यांच्यावर काय कारवाई होणार? पाहूया या खास रिपोर्टमधून...

Girish Nikam

लाडकी बहिण योजनेनं सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता देताना सरकारची दमछाक होत आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं अर्जांची काटेकोर छाननी सुरू केली आणि निकषात न बसलेले लाखो अर्ज आत्तापर्यंत अपात्र ठरवण्यात आलेत. याच छाननीत लाडकीच्या पैशांवर चक्क हजारो भावांनीही डल्ला मारल्याचं उघड झालंय.

लाडकीच्या नावाखाली नेमक्या किती भावांनी सरकारच्या तिजोरी लुटलीय ते पाहूया..

लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला

- अर्जांच्या छाननीत भावांची घुसखोरी उघड

- 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याचं उघड

- 10 महिन्यांपर्यंत 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप

- 2 लाख 36 हजार 14 लाभार्थींच्या नावांबाबत संशय

योजनेते घुसखोरी केलेल्या या सर्व भावांना सरकारने इशारा दिलाय. आत्तापर्यंत दिलेल्या प्रत्येक हप्त्यांची त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहेत.

दोन सरकारी योजनांचा लाभ घेतलेले, सरकारी नोकरी असूनही लाभार्थी असलेले आणि चार चाकी वाहन असलेले अर्ज अपात्र ठरवण्यात आलेत. त्यांचा लाभ बंद केला असून योजनेतून अपात्र महिलांची नावं काढून टाकली असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला ? त्यासाठी जबाबदार कोण ? असे प्रश्नही यानिमित्तानं निर्माण झालेत. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची काटेकोरपणे तपासणी केली नसल्यानेच भावांचं फावलय. योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असताना आता तरी खरोखरच्या गरजू, गरीब महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's lucky zodiac signs: आजचा दिवस ठरणार खास; 'या' ४ राशींवर धनसंपत्ती आणि यशाचा वर्षाव

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५ लाख रुपये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागात दौरा

Poonam Pandey : लव कुश रामलीला समितीचा मोठा निर्णय; पूनम पांडेची एक्झिट, कोण साकारणार मंदोदरीची भूमिका?

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, १० जणांचा बळी, ३३७ जनावरे दगावली

SCROLL FOR NEXT