Wardha Ladki Bahin Yojana saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: वर्ध्यातील ३२०० लाडक्या बहिणी कारच्या मालकीण; जिल्ह्यातील बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार

Wardha Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे अर्जांची पडताळणी केली जात आहे. ज्या महिलां योजनेच्या निकषात बसणार नाहीत त्यांना अपात्र केलं जाणार आहे.

Bharat Jadhav

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

कारच्या मालकीण असणाऱ्या लाडक्या बहिणींनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब वर्ध्यात समोर आलीय. जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ३२०० महिलांना अपात्र होणार आहेत. महायुती सरकारची लोकप्रिय लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करण्यात आले आहेत. ज्या महिला या योजनेच्या पात्रतेत बसणार नाहीत, त्यांना अपात्र केलं जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे जर चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींच्या अर्जांची आता पडताळणी केली जात आहे. त्यातून वर्धा जिल्ह्यातील ३२०० महिला अपात्र होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या खात्यात थेट १५०० रुपये टाकण्यात आले.

आता या योजनेचे नवीन नियम आणण्यात आले आहेत. आता ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्या महिलांचा नावावर चार चाकी वाहन आहे, अशा महिलांची यादी परिवहन विभागाने महिला व बाल कल्याण विभागाला पाठवली आहे. यामुळे या ३२०० लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. दुसरीकडे पात्र ठरलेल्या १८ लाडक्या बहिणींनी संबंधित योजनेचा लाभ नको, असा रीतसर अर्ज दाखल केला आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देत त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करायला सुरुवात केली आहे. पण निवडणुका झाल्यानंतर सरकारने या योजनेसाठी नवीन नियम आणि अटी लागू केल्या आहेत. यामुळे अनेक लाडक्या बहिणींना योजनेत अपात्र होण्याच्या शक्यतेमुळे लाडक्या बहिणींची धडधड वाढली आहे.

नवीन नियम लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील १८ महिलांनी महिला आणि बाल विकास विभागाला योजनेचा लाभ न घेण्यासाठी पत्र लिहिले आहे. परिवहन विभाग (आरटीओ) ने वर्धा जिल्ह्यातील त्या महिलांची यादी तयार केली आहे ज्यांच्या कडे कार आहे. त्याच आधारावर लवकरच सर्वेक्षण सुरू केले जाईल. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी अनेक नियम आहेत. त्यातले एक मुख्य नियम असे आहे की, जर महिलांच्या नावावर कार किंवा ट्रॅक्टर असेल, तर ती महिला योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीय. यामुळे आता या लाडक्या बहिणींची धडधड वाढली आहे. पात्र लाडक्या बहिणींची फेरतपासणी संबंधित विभागाकडून केली जाणार आहे. यात आता किती लाडक्या बहिणी अपात्र होतात हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT