Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढलं, २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana Verification Process: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांच्या पडताळणी आता अडथळे निर्माण झाले आहे. उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभाग असहकार्य करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाने असहकार दर्शवला आहे. अजूनपर्यंत आयकर विभागाने सहकार्य न केल्याने लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आता रखडली आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र, लवकरच या अर्जांची पडताळणी होईल. त्यातील नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येईल.

लाडकी बहीण योजनेत २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागण्यात आली होती.मात्र, दोन महिन्यांपासून मागितलेली ही माहिती आयकर विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची तपासणी पूर्ण होऊ शकलेली नाही. परंतु लवकरच या महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे.

लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आली होती. मात्र, ही माहिती न मिळाल्याने पडताळणी आता ठप्प झाली आहे. महिला व बालविकास विभागाने २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती मागवली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळेच आयकर विभागाच्या मदतीने पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले होते.

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत अडथळे (Ladki Bahin Yojana Verification Process)

दरम्यान, आता आयकर विभागाने दोन महिन्यांपासून कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत अडथळे येत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांनी विधानसभा निवडणुकाआधी अर्ज केले होते. यातील काही महिलांनी निकष डावलून लाभ घेतला आहे. त्यामुळेच महिला व बालविकास विभागाने दोन महिन्यांपूर्वी पत्र लिहून आयकर विभागाकडे महिलांच्या उत्पन्नाबाबत माहिती मागितली होती.परंतु माहिती न मिळाल्यानंतर फेरतपासणीसाठी अडथळे येत आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांची अंगणवाडी सेविकांनी जाऊन पडताळणी केली आहे. यासाठी परिवहन विभागाची मदत घेण्यात आली होती. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shardiya Navratri 2025: हिऱ्याप्रमाणे चमकणार 'या' राशींचं नशीब; आर्थिक स्थिती मजबूत होणार

Navratri Shopping: नवरात्री शॉपिंगसाठी मुंबईतील Top 8 मार्केट्स, गरबा ड्रेस फक्त 800 रुपयात

Maharashtra Live News Update: आज नंदुरबार जिल्हा बंदची हाक

Snacks Recipe : मुलांना टिफीनसाठी हेल्दी अन् चटपटीत स्नॅक्स ऑप्शन

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3' चा ओपनिंग डेला बोलबाला, पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT