Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे.
महिलांसाठी सरकारची लाडकी बहीण योजना सुरू आहे.
दरमहिन्याला १५०० रूपये मिळणाऱ्या या पैशांत आता वाढ होणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण अंतर्गत महिलांना एकूण ९ हप्ते मिळाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी १५०० रूपयांऐवजी २१०० मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती.
यामुळेच महिलांना लाडक्या बहिणींचे २१०० कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
यावर आता २१०० नाही तर ३००० रूपये देऊ मात्र काही दिवस थांबावे लागेल असं म्हटलं आहे.