Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojan : पैसे काढण्यासाठीही बहिणींची लूट, ग्राहक सेवा केंद्राकडून शुल्क आकारणी

Ladki Bahin Yojan Update : लाडकी बहीण योजनेत लूट सुरु असल्याचे प्रकार समोर येतायेत. ग्राहक सेवा केंद्राकडून एक हजारांमागे 30 रुपये घेतले जात असल्याची तक्रार आहे. तर बँकाही कर्ज वसुलीच्या नावानं लाभार्थ्यांच्या खात्यातील पैसे वळते करुन घेतायेत.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत लूट सुरु असल्याचे प्रकार समोर येतायेत. ग्राहक सेवा केंद्राकडून एक हजारांमागे 30 रुपये घेतले जात असल्याची तक्रार आहे. तर बँकाही कर्ज वसुलीच्या नावानं लाभार्थ्यांच्या खात्यातील पैसे वळते करुन घेतायेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाईचा इशारा दिलाय.पाहूया एक रिपोर्ट..

मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या लाडक्या बहिण योजनेतल्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. अनेक ठिकाणी पैसे काढून देण्यासाठी महिलांची लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील पारूंडीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. इथे लाडकी बहिण योजनेचे पैसे काढून देण्यासाठी ग्राहक केंद्र चालकच पैसे घेत असल्याचं समोर आलंय. एक हजार रुपयांमागे 30 रुपये मागितले जात आहेत. या योजनेसाठी गावागावांत बँकांमध्ये महिलांची झुंबड उडालीय. याचाच फायदा अनेक ग्राहक सेवा केंद्र घेत आहेत. त्याचा जाब सजग नागरिकांनी या केंद्र चालकांना विचारला आहे.

महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेबाबत घडलेल्या या प्रकाराबाबत भाजपचे ज्येष्ठ मंत्री मात्र गंभीर दिसत नाहीत. एका घटनेने योजनेवर परिणाम होणार नाही, असं लाडक्या बहिणींच्या लुटीवर मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. तर दुसरीकडे काही बँकाही लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झालाय. कर्ज वसुलीच्या नावानं महिलांच्या खात्यातील पैसे कापून घेण्यात येत आहेत. महिलांच्या इतर कर्जाचे हप्ते वसुल करण्यासाठी बँकांनी ही शक्कल लढवली आहे. मात्र असे पैसे वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी आणि फॉर्म भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. नाशिकच्या घोटीत तर सकाळपासून येऊनही नंबर न लागल्याने अनेक महिलांनी रात्री बँकेच्या आवारातच मुक्काम केलाय. असं चित्र अनेक ठिकाणी आहे. तर दुसरीकडे या लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे याला चाप बसावा आणि लाभार्थींना पूर्ण पैसे मिळावेत अशी मागणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' लोकांनी चुकूनही सकाळच्या वेळी चहा पिऊ नये

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

IPL 2025 Mega Auction: ५७७ पैकी १८२ खेळाडू झाले मालामाल! पाहा सर्व १० संघांची संपूर्ण यादी

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? वाचा

IQ Test: 'या' फोटोमध्ये लपलेली बाटली शोधा; तुमच्याकडे आहेत केवळ ८ सेकंद

SCROLL FOR NEXT