District officials begin scrutiny of Laadki Bahin Yojana beneficiaries as fake claimants surface across Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: अपात्र बहिणींच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे, पडताळणीच्या अहवालानंतर लाभ बंद, बोगस भावांनाही नोटीसा बजावणार

District Collector Action Against: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी आहे. अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे योजनेत घुसखोरी केलेल्या बोगस भावांनाही नोटीस पाठवली जाणार आहे.

Girish Nikam

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, वयाचा निकष पूर्ण न करणे, सरकारी कर्मचारी आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त अशा महिलांच्या याद्या जिल्हाधिका-यांकडे पाठविल्या आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची पडताळणी होईल.

अपात्र असतानाही अर्ज करणा-यांची संख्या 40 लाखांवर आहे. त्यात 14 हजारांहून अधिक पुरुष आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर तब्बल सहा हजार कोटीहून अधिक रक्कम वितरीत झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल होणार आहे. बँकांशी पत्रव्यवहार करून अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम रोखली जाणार आहे

सरीकडे एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४३०पुरुष लाभार्थी असून त्यांच्याकडून वसुल केली जाणारी रक्कम तब्बल २०कोटींपेक्षाही अधिक आहे.

एकूण लाभार्थी 11,09,487

दरमहा वितरीत निधी - 166 कोटी 42 लाख

अपात्र लाभार्थी - 1 लाख 97 हजार

पुरुष लाभार्थी - 430

पुरुष लाभार्थ्यांकडून 23 कोटी 10 लाख रुपये वसूल करणार

एका जिल्ह्यातील जर ही आकडेवारी असले तर संपूर्ण राज्यात असे किती अपात्र लाभार्थी असतील याची कल्पना करा...दुसरीकडे पुरुष लाभार्थ्यांना रक्कम परत करण्यासाठी महिनाभराची मुदत सरकार देणार आहे.अपात्र लाडक्या बहिणींचीही प्रशासनाकडून कसून पडताळणी केली जाणार आहे. काटेकोर छाननीनंतर आता भविष्यात तरी गरजू महिलांनाच लाभ मिळून योजनेचं उद्दीष्ट पूर्ण होणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT