Who is Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि त्याने गायलेलं वादग्रस्त गाणं सध्या तापलेल्या विषयांपैकी एक बनलं आहे. त्याने एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तिखट शब्दात बाण सोडले. कुणालने शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं. यानंतर शिवसैनिक पेटून उठला. कुणालच्या सेटवर त्यांनी तोडफोड केली. तसेच त्याच्याविरोधात अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Who is Kunal Kamra). पण कुणाल कामरा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मुळचा मुंबईचा कुणाल कामराची ओळख स्टँडअप कॉमेडियन म्हणून आहे. तो राजकारण, बॅचलर लाइफ आणि टीव्ही जाहिरातींवर विनोद सादर करतो. प्रॉडक्शन असिस्टेंट म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. नंतर २०१३ साली कॉमेडियन म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लब या कार्यक्रमामध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून तो काम करत होता. कमी वेळातच त्याला प्रसिद्धी मिळाली. कुणाल आपल्या बेधडक आणि निर्भय स्टँडअप कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्याचे शो बऱ्याचदा हाऊसफुल्ल असतात.
अर्णब गोस्वामींसोबत वाद
२०२० साली कुणाल कामरा अडचणीत सापडला होता. एकाच विमानातून कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी प्रवास करत होते. नंतर त्याने अर्णबसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून वेगळाच वादंग निर्माण झाला होता. कुणालने अर्णब गोस्वामीसोबत फ्लाइटमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विमान कंपन्यांनी आक्षेप घेत ६ महिन्यांसाठी त्याच्या हवाई प्रवासावर बंदी घातली होती.
नेमकं प्रकरण काय?
कुणाल कामरा २०२० सालीच्या प्रकरणानंतर तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुणालने खारमधील त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंम्बनात्मक गाणं सादर केलं. हे गाणं राज्यातील ३ वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपावर आधारीत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. या गाण्यावरून आता राजकारणात गदारोळ सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.