Kunal Kamra Row  saam tv
महाराष्ट्र

Kunal Kamra Row: कुणाल कामराची एकनाथ शिंदेंवर टीका, BMC अॅक्शन मोडवर; स्टुडिओवर मारला हातोडा

Kunal Kamra Row BMC Demolishes Parts Of Habitat Studio: कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांवर विनोद केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी कामराला माफी मागण्यास सांगितले. परंतु त्याने माफी मागण्यास नकार दिलाय.

Bharat Jadhav

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंवर विनोद केल्यानंतर बीएमसी कामाला लागलीय. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवल्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून कामराविरोधात आंदोलन केली गेली. तर काही शिवसैनिकांनी कामराला फोनवरून संपर्क साधत त्याला धडा शिकवण्याची भाषा केली. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागलीय. बीएमसीने कामराचा जेथे शो झाला त्या द हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाई केलीय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडविल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडलाय. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. कामरावर कायद्यानुसार, जी काही कडक कारवाई करता येईल, ती करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कामाला लागले असून त्यांनी कामराला संपर्क साधलाय. पोलिसांनी त्याला फोन करत माफी मागण्यास सांगितलं, पण त्याने त्याला नकार दिला. दुसरीकडे मुंबई महानगरपालिका कामाला लागलीय.

ज्या स्टुडिओमध्ये कामराचा शो झाला त्या द हॅबिटॅट स्टुडिओवर बीएमसीने हातोडा चालवलाय. दरम्यान सरकारच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराला पाठिंबा दिला आहे. तसेच स्टुडिओवरील हल्ल्याचा निषेध केला तर हे भ्याडपणाचे कृत्य असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

द हॅबिटॅट स्टुडिओची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याने या वादाला हिंसक वळण मिळाले, ज्यामुळे शिवसेना नेते राहूल कनालसह १२ जणांना अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदेंची गाण्यातून खिल्ली उडवल्यानंतर बीएमसी अॅक्शन मोडवर आलीय. रविवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये कामराचा शो झाला होता. त्या हॉटेलवर पाडकामाची कारवाई करण्यात आलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेनेखार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये असलेल्या द हॅबिटॅट स्टुडिओचे पाडकाम केलंय. नागरी नियमांचे उल्लंघन केलंय.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कामराचा शोध घेतला जात असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिलीय. शिंदेंना गद्दार म्हटल्याप्रकरणी कुणाल कामराने माफी मागावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

तसेच त्याचावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असंही फडणवीस म्हणाले. "प्रत्येकाला स्टँड-अप कॉमेडी करण्याचा अधिकार आहे, परंतु स्वातंत्र्य हे अनियंत्रित वर्तन नसावे. कामराने त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT