Shivsena Uddhav Thackeray workers wave banners in Pune Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News : ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी…; ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं, पुण्यात बॅनरबाजी

Pune Shivsena Thackeray Group Banner : या बॅनरबाजीच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यात आल्याचं साफ दिसत आहे. आता यावर शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prashant Patil

पुणे : प्रसिद्ध कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका गाण्याच्या साहाय्याने विडंबन केलं. या गाण्यात कामाराने शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील हॅबिटेट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली.

तर या प्रकरणावरुन मागील तीन दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाकरे गटाकडून ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का…? असा सवाल करत बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरबाजीच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यात आल्याचं साफ दिसत आहे. आता यावर शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं बॅनर काढण्यात आलेलं आहे.

मी कोणालाही घाबरत नाही

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका गाण्यामार्फत विडंबन केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र कुणाल कामरा हजर राहिला नाही. त्याचदरम्यान कुणाल कामरा म्हणाला, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे. अशी पोस्ट त्याने केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT