Kunal Kamra Saam
महाराष्ट्र

Kunal Kamra News: '...मरने से मैं कभी डरता नहीं', शिंदे सेनेच्या अॅक्शनवर कुणाल कामराची पोस्ट; 'त्या' फोटोवरून वाद पेटणार

Kunal Kamra controversy: शिंदे सेनेच्या अॅक्शनवर कुणाल कामराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियात चर्चा होत आहे.

Bhagyashree Kamble

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने मुंबईमधील एका शोमध्ये राज्यात ३ वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपावर विडंम्बनात्मक गाणं सादर केलं. गाण्याद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला.

व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिकांची माथी भडकली. त्यांनी खारमधील स्टुडिओची तोडफोड केली. चोही बाजूने टीकेची झोड उठत असताना कुणाल कामराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टचीही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होत आहे.

स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणालने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. कुणालने एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या हातात संविधानाची एक प्रत दिसत आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर त्याने कॅप्शनही लिहिलं आहे. 'The Only Way Forward' (पुढे जाण्याचा एकमेव मार्ग) असं कॅप्शन दिलं आहे.

तसेच त्याने इन्स्टाग्रामवर युट्युबची लिंक शेअर केली आहे. त्याने लिंक कमेंटमध्ये शेअर करत 'बादशाह हो बादशाह' हे गाणं पोस्टमध्ये टाकलं.

दरम्यान, कुणाल कामराच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता तुला संविधानाची आठवण आली का? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.

संजय राऊतांकडून कौतुक

कुणाल कामराचं गाणं व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी टीकेची झोड उठवली. तर संजय राऊतांनी कुणाल कामराचं कौतुक केलं. तर, शिवसेना शिंदेगटाचे नेते संजय निरूपम यांनी कुणाल कामराला धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेचे आमदार मुराजी पटेल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कुणाल कामाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT