Amravati News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News: परीक्षेला प्रवेश नाकारल्याने विद्यार्थिनी चक्कर येऊन धाडकन खाली कोसळली; परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ

Krushi Sevak Bharti Exam: या परीक्षेसाठी चंदना रामकृष्ण वाहुरवाघ ही विद्यार्थिनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोहोचली. मात्र रिपोर्टिंग टाईमनंतर फक्त तिला 2 मिनिटे उशिर झाला त्यामुळे तिला परीक्षेला बसू दिले नाही.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Amravati:

अमरावतीमधील सिटी लँड परीक्षा सेंटवर मोठा गोंधळ झाला आहे. एका विद्यार्थीनीला परीक्षेला बसू न दिल्याने तिची प्रकृती अचानक बिघडलीये. परीक्षेला पोहचण्यास तिला उशिर झाला त्यामुळे तिला बाहेर उभं करण्यात आलं. या गोष्टीमुळे तिला फार वाईट वाटले आणि तिला थेट चक्कर आली. यामुळे परीक्षाकेंद्रावर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज कृषी सेवक या पदाची अमरावतीच्या सिटी लँडमधील एका सेंटरवर ऑनलाईन परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी चंदना रामकृष्ण वाहुरवाघ ही विद्यार्थिनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोहोचली. मात्र रिपोर्टिंग टाईमनंतर फक्त तिला 2 मिनिटे उशिर झाला त्यामुळे तिला परीक्षेला बसू दिले नाही.

यामुळे या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली व चक्कर येऊन ती खाली पडली. मात्र कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थिनीला दवाखान्यात नेण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. एकतर सिटीलँड हे सेंटर अमरावती शहरापासून दहा किलोमीटर दूरवर आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सिटी बस किंवा इतर वाहने देखील उपलब्ध नसतात. अशावेळी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्याऐवजी त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याने विद्यार्थ्यांचा या परीक्षेत येणाऱ्या आयबीपीएस एजन्सी विषयी संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT