MP Nagesh Patil Ashtikar News:  Saamtv
महाराष्ट्र

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Krishna Ashtikar : सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेनंतर कृष्णा आष्टीकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मृत आईच्या दुःखाचा राजकीय वापर करू नका, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीसोबत असल्याचा पुनरुच्चार केला.

Namdeo Kumbhar

Krishna Ashtikar, Sushma Andhare, Nanded Politics : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, नांदेडमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले. महाविकास आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "सुषमा अंधारे यांनी माझ्या कुटुंबावर घेतलेले तोंडसुख मला प्रचंड 'हर्ट' करून गेले असून, माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार या लोकांनी मांडला आहे," असा संताप कृष्णा आष्टीकर यांनी व्यक्त केला.

'मला मतदान करू नका म्हणायला अंधारे कोण?'

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत कृष्णा आष्टीकर यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. यावर प्रत्युत्तर देताना आष्टीकर म्हणाले, "राजकारणात चतुर असावेच लागते, त्याशिवाय राजकारणी म्हणून ओळख कशी मिळणार? मात्र, सुषमा अंधारे यांनी जे लिहिले आहे ती निव्वळ अतिशोक्ती आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांनी 'कृष्णा आष्टीकरांना मतदान करू नये' असे लिहिले. मला मतदान करायचे नाही, तर मग कोणाला करायचे? अंधारे नेहमीच असे काहीतरी बोलत असतात आणि म्हणूनच कदाचित लोक त्यांच्यावर नाराज आहेत."

नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंसोबत बोलणे झाले!

आपली निष्ठा अजूनही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करताना आष्टीकर म्हणाले, "मी थोड्या वेळापूर्वीच मिलिंद नार्वेकर साहेबांशी बोललो आहे. माझे उद्धव ठाकरे साहेबांशी आणि नार्वेकर साहेबांशी उत्तम संबंध आहेत. काँग्रेसनेही मला अधिकृत व्हीप (Whip) बजावून मतदान करायला सांगितले आहे. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे—मी आघाडीसोबत होतो, आहे आणि राहणार. सुषमा अंधारे यांना नक्की काय अडचण होती किंवा माझ्याबद्दल काय आकस होता, हे देव जाणे! जर शिंदे गटातील गजानन कीर्तिकर आणि ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर हे पिता-पुत्र एकत्र स्वीकार्य असू शकतात, तर कृष्णा पाटील आष्टीकर का नाही?"

'तो बालिशपणा आणि केवळ अफवा'

वडील (खासदार पाटील आष्टीकर) यांच्या कथित नाराजीवर बोलताना कृष्णा आष्टीकर म्हणाले, "कोणी सांत्वन केले नाही किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून कोणी नाराज होईल, एवढे बालिश इथे कोणीच नाहीये. माझ्या दिवंगत आईच्या दुःखाचा कोणीही राजकीय बाजार करू नये. कोणाच्या वैयक्तिक आणि दुःखद आयुष्यावर बोलणे राजकीय नेत्यांना शोभत नाही, मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो."

वडील बेपत्ता; फोन बंद असल्याने कुटुंब चिंतेत!

दरम्यान, खासदार आष्टीकर यांच्याशी संपर्क होत नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. "आष्टीकर साहेब कुठे आहेत, याची मला अजिबात कल्पना नाही. ज्यावेळेसपासून त्यांचा फोन बंद झाला आहे, आमचा परिवार टेन्शनमध्ये आहे. योगायोग असा की ते जाताना त्यांची गाडीही घेऊन गेले नाहीत आणि त्यांचा पीए (PA) देखील त्यांच्यासोबत नाहीये. ते सुज्ञ आणि समर्थ आहेत, त्यामुळे मी पोलिसांत कोणतीही तक्रार करणार नाही. ते लवकरच परत येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजयाचा दावा करताना आष्टीकर म्हणाले की, २२ तारीखला गुलाल नक्कीच उधळेल आणि मॅजिक फिगरपेक्षा मला २० ते ३० मते अधिक मिळतील. जे '३००-४०० पार'च्या बाता मारत आहेत, त्यांनी बहुधा पाकिस्तानातून मतदान आयात केले असावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 साठी प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT