22-year-old woman forest guard found dead in Sindhudurg saam tv
महाराष्ट्र

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

Amboli Forest Department Employee Found Dead: आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलंय. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bharat Jadhav

  • महिला वनरक्षकाच्या मृत्यूची धक्कादायक घटना

  • माडखोल धवडकी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली.

  • मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस तपास सुरू आहे.

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. आंबोली वन परिमंडळात केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय महिला कर्मचारीनं आपल्या राहत्या घरात जीवन संपवल्याची घटना घडलीय. आश्लेषा सागर मांगले (मूळ रा. आजरा कोल्हापूर) या महिला कर्मचारीचं नाव आहे.

माडखोल धवडकी येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची सांगण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या आत्महत्येचे नेमके कारण हाती आले नाहीये. ​मिळालेल्या माहितीनुसार, आश्लेषा मांगले या तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन खात्यात सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्यावर आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आश्लेषा सागर मांगले या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने आश्लेषा दिवसभर घरातच होत्या. मात्र, उशिरापर्यंत त्या बाहेर न आल्यामुळे घर मालक गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. जोर जोरात दरवाजा ठोठवल्यानंतरही घरातून काहीच आवाज न आल्यानं त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले. घरातील दृश्य पाहून घर मालकांच्या पायाखालील जमिनी सरकली. त्यांना आश्लेषा या लटकलेल्या अवस्थेत दिसल्या.

​घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

खड्डेमुक्त रस्त्यांची मंत्र्यांकडूनच पोलखोल, गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब'

Nashik Firing: नाशिकमध्ये गोळीबाराने खळबळ! पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर फायरिंग

जेन झी'चे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT