कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, ११ एप्रिलपासून आणखी एक एसी स्पेशल एक्सप्रेस धावणार Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, ११ एप्रिलपासून आणखी एक एसी स्पेशल एक्सप्रेस धावणार

AC Special Train: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण रेल्वे ११ एप्रिल ते २३ मे २०२५ दरम्यान एलटीटी (मुंबई) ते करमाळी (गोवा) साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस गाडी चालवणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळी हंगामात मुंबई, पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागांतील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकण आणि गोवा कडे प्रवास करतात. यामुळे या मार्गांवर दरवर्षी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेमार्गावर वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी चालविण्यात येणार आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मुंबई ते करमाळी (गोवा) दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी धावेल. ही गाडी संपूर्ण एलएचबी डबे (LHB coaches) असलेली असेल. पूर्णतः वातानुकूलित (AC) डबे असतील. एकूण २२ एलएचबी वातानुकूलित डबे असणार आहेत.

एलटीटी - करमाळी (गोवा) ही गाडी प्रत्येक शुक्रवारी (११ एप्रिल ते २३ मे) पर्यंत असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) हून रात्री १०:१५ वा. सुटेल. दुसऱ्या दिवस (शनिवार) करमाळी येथे दुपारी १२:०० वा. पोहचेल.

करमाळी - एलटीटी (मुंबई) प्रत्येक शनिवार (१२ एप्रिल ते २४ मे) दरण्यान करमाळी वरून दुपारी २:३० वा. सुटेल. तर दुसऱ्या दिवस (रविवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ला पहाटे ४:०५ वा. पोहचेल.

या गाडीचे थांबे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी असे असणार आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

Rain Alert : महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढचे ६ दिवस राहा सतर्क!

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT