Konkan Railway Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Railway : ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांचे हाल

Rohini Gudaghe

अमोल कलये, साम टीव्ही रत्नागिरी

कोकण रेल्वेसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकण रेल्वेमार्गावर काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत, तर नियमित धावणाऱ्या गाड्या दिड तास उशीराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत असल्याचं समोर आलंय.

कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या सोडण्यात आल्या (Konkan Railway schedule collapsed) आहेत. यामध्ये कोकणकन्या , तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस गाड्या उशीरानं धावत आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रेल्वेचा वेग मंदावलाय. याचा फटका मात्र चाकरमाण्यांना बसत आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. परंतु आता गाड्या उशिराने धावत असल्यामुळे त्यांनी गावी पोहोचण्यास देखील उशीर होणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर तुफान गर्दी

अनेक चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने कोकणात निघाले (Konkan Railway) आहेत. त्यामुळे वाहनांची तुफान गर्दी मुंबई गोवा महामार्गावर दिसत आहे. मुंबई गोवा महामार्गावर संथ गतीने वाहतुक सुरू आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे ते लाखपाले दरम्यान अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पेण तालुक्यातील कासू, गडब परिसरात देखील वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचं चित्र (Konkan Railway schedule) आहे.

गणेशोत्सवासाठी जाडा गाड्यांचं नियोजन

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) एसटीनं देखील मोठं नियोजन केलंय. कोकणासाठी पुण्यातून 325 एसटी बस सोडण्यात येत आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील जादा गाड्यांचे नियोजन केलंय. राज्यभरातून जवळपास 5 हजार बसचं नियोजन करण्यात आलंय. पुण्यातून कोकणात जाणाऱ्या 325 बस फुल झाल्या आहेत. ऐनवेळी स्थानकांवर गर्दी झाल्यास आणखीन गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT