Konkan Railway News Saam TV
महाराष्ट्र

Konkan Railway News : कोकण रेल्वेची वाहतूक कधीपर्यंत होणार सुरळीत? प्रशासनाने दिली मोठी अपडेट

Konkan Railway Latest Marathi News : मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, वाहतूक कधी सुरळीत होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Satish Daud

रत्नागिरीतील खेडजवळील दिवाणखवटी या ठिकाणी रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या काही एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. दरम्यान, रेल्वेची वाहतूक कधी सुरळीत होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

अशातच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रेल्वे वाहतुकीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीपासूनच दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, पावसाची संततधार सुरू असल्याने कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होऊ शकते.

झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच प्रवाशांनी धीर धरावा, असं आवाहन देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे. दरम्यान, दरड कोसळल्याने दिवा- रत्नागिरी गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मडगाव जंक्शन-सीएसएमटी-मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी रोड-दादर-तुतारी एक्सप्रेस, मंगळुरु जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

इतर मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या

  • पाटणा - वास्को द गामा एक्स्प्रेस ही जिते येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली

  • लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस ही गाडी रोहा येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर मार्गे वळविण्यात आली आहे

  • गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्स्प्रेस ही विन्हेरे येथून माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे

  • हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्स्प्रेस काल माणगाव येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू मार्गे वळविण्यात आली आहे

  • लोकमान्य टिळक -तिरूवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस करंजाडी येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम मार्गे वळविण्यात आली आहे

रेल्वे स्थानकात थांबून असलेल्या गाड्या

  • मडगाव जं.-मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही काल सायंकाळपासून खेड येथे थांबून आहे.

  • सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेस ही काल सायंकाळपासून दिवाणखावटी येथे थांबून आहे.

  • मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी येथे काल सायंकाळपासून थांबून आहे.

  • मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस ही देखील काल सायंकाळपासून रत्नागिरी स्थानकात थांबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Delhi Tourism : दिल्लीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांचे आकर्षण, सुट्टीत येथे ट्रिप प्लान कराच

Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या जयवंत नगर गावातील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढले

iPhone 15 Offer: मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर! आयफोन १५ वर मिळत आहे २०,००० रुपयांची सूट, लगेच ऑर्डर करा

SCROLL FOR NEXT