CM Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोकणात भाजपकडून मोठी कारवाई, बड्या नेत्यासह चौघांची पक्षातून हकालपट्टी

Big Action by BJP in Chiplun: चिपळूनमध्ये भाजपने मोठी कारवाई केली. भाजपच्या माजी नगराध्यक्षांसह चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

Priya More

Summary -

  • भाजपने कोकणात मोठी कारवाई केली

  • माजी नगराध्यक्षांसह चौघांविरोधात कठोर कारवाई केली

  • माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह चार नेत्यांची हकालपट्टी

  • नगरपरिषद निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

कोकणामध्ये भाजपने मोठी कारवाई केली आहे. बड्या नेत्यासह चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह ४ पदाधिकाऱ्यांना भाजपने दणका दिला. या सर्वांविरोधात पक्षाने कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर या सर्वांविरोधात ही कारवाई केली.

चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहरप्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणे या सर्वांना भोवले. सुरेखा खेराडे चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष तर परिमल भोसले निलेश राणे यांचे खंदे समर्थक होते. भाजपने केलेल्या कडक कारवाईमुळे चिपळूणमध्ये राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणे आणि उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविल्याचे पुराव्यासह आढळून आल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सुधीर सुधाकर पानकर, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष परिमल भोसले या सर्वांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पत्रक देखील जाहीर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT