rane brothters Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

Konkan Political News : कोकणात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पेटलेला असतानाच एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना बळ दिलयं... मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कुणाच्या बाजूने आहेत? शिंदे सेनेचे दीपक केसरकारांच्या कोणत्या विधानानं भाजप आक्रमक झालीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Vishal Gangurde

मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीत पैसे वाटपावरून निलेश राणेंनी भाजपला लक्ष्य केलं...दुसरीकडे मंत्री नितेश राणेंनी या वादात उडी घेतली आणि कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष सुरू झाला..आणि या दोन बंधूच्या संघर्षात एकनाथ शिंदें निलेश राणेंच्या बाजूने ठाम उभे राहिले. विरोधकांवर मात करण्यासाठी निलेश राणेंच्या पाठिंशी सदैव उभं असल्याचं शिंदेंनी भरसभेत जाहीर करून टाकलं. तर दुसरीकडे फडणवीसांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राणे बंधूमधील या संघर्षाला असलेली दुसरी बाजू म्हणजे भाजप विरुद्ध शिंदेसेना..... भाजपला मत देणं म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखं आहे असं विधान केसरकारांनी केलयं...तर केसरकरांच्या आरोपांवर शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय...

कोकणात शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निलेश राणेंच्या आरोपानंतर आता आणखीच वाढलीय.. त्यात पक्षाच्या वर्चस्वावादाच्या लढाईत राणे कुटुंबातही वादची ठिणगी पडलीय.. मात्र भरसभेतून शिंदेंचं निलेश राणेंना बळ देणं आणि फडणवीसाची आत्मचिंतनाची भाषा महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचेच संकेत देतेय...त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तरी महायुतीतील हा वाद शमणार की आणखी विकोपाला जाणार.. हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

Cyber Crime: सायबर क्राइमविरोधात केंद्र सरकारची अॅक्शन; नवीन अॅप लॉन्च, स्मार्टफोन अपडेटसाठी कंपन्यांना ९० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT