Kolhapur Home Robbery Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Kolhapur Home Robbery News : कोल्हापूर जिल्ह्यातील टोप परिसरात झोपेत असलेल्या कुटुंबावर गुंगीचे औषध फवारून चोरट्यांनी सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. कुत्र्यालाही बेशुद्ध करण्यात आले असून शिरोली एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात घरफोडीचा थरार

  • कुटुंबीयांसह कुत्र्यालाही दिल गुंगीचं औषध

  • सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरीला

  • शिरोली एमआयडीसी पोलिसांचा सखोल तपास सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील टोप परिसरात झोपेत असलेल्या कुटुंबियांवर गुंगीचे औषध फवारून सव्वातीन लाखांची घरफोडी करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे घरफोडी करताना भुंकणाऱ्या कुत्र्यांनाही गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील टोप इथल्या महामार्गालगत सेवा मार्गाशेजारी वैभव बाळासाहेब पाटील यांचे गजानन इलेक्ट्रिकल दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस त्यांचे घर आहे. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी वैभव यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी सरकवून घरात प्रवेश केला.

झोपेत असणारे वैभव पाटील, त्यांची आई, भाऊ आणि आजी यांच्या तोंडावर गुंगीचे औषध मारून त्यांना बेशुद्ध करून दागिने, रोकड, असा सुमारे सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यामध्ये दोन तोळे सोन्याचे दागिने, दोन चांदीची कडे व रोख एक लाख रुपये यांचा समावेश आहे. दोघा चोरट्यांनी लाल व राखाडी कलरचे जॅकेट आणि तोंडाला रूमाल बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाले आहे.

पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस दागिन्याचे रिकामे बॉक्स व रिकामी पर्स आढळली. वैभव यांच्या कुत्र्यालाही गुंगीचे औषध घालून बेशुद्ध केले होते. शेजारीच राहत असणारे वैभव यांचे आजोबा कृष्णात गायकवाड मध्यरात्री लघुशंकेसाठी जागे झाले. त्यामुळे घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी वैभव आणि कुटुंबीयांना जागे केले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चोरीची माहिती घेतली. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात, या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

ODI ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा; प्रिन्स गिलने किंग कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर?

EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT