Kolhapur: करंजगाव येथील जवानाचा आसाममध्ये मत्यू संभाजी थोरात
महाराष्ट्र

Kolhapur: करंजगाव येथील जवानाचा आसाममध्ये मत्यू

करंजगाव येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान नितेश महादेव मुळीक (वय- २८) याचा आसाममध्ये (Assam) सेवा बजावत असताना मत्यू झाला

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: करंजगाव (ता. चंदगड) येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान (Soldiers) नितेश महादेव मुळीक (वय- २८) याचा आसाममध्ये (Assam) सेवा बजावत असताना मत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा कळवली आहे. यामुळे करंजगावसह (Karanjgaon) चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे. आसाम येथील सीमेवर (border) नितेश हे सेवा बजावत होते. त्याचा बुधवारी मत्यू झाला आहे. (Kolhapur Soldiers of dies in Assam)

हे देखील पहा-

नितेशचे वडील महादेव मुळीक हे सैन्यातून निवत्त झाल्यावर २०१४ साली तो १७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण करंजगावात तर उच्च माध्यमिक शिक्षण हलकर्णी या ठिकाणी झाले आहे. काही दिवसाअगोदर तो सुट्टीवर आला होता. आपली पत्नी (Wife) गरोदर असून तिच्या बाळतंणात सुट्टीवर येतो, असे सांगूनही तो गेला होता. पण या घटनेने त्याची ती इच्छा ही अपुरी राहीली आहे. बुधवारी सायंकाळी नितेशच्या निधनाचा निरोप समजताच कुंटुबियांनी हबंरडा फोडला आहे. गुरुवारी त्यांच्या सांत्वनासाठी नातेवाईक तसेच तालुक्यातील अनेक लोकांनी भेट घेतली आहे.

नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी बेळगाव जवळील सांबरा येथील विमानतळावर (airport) आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या युनिटच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पार्थिव करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी नितेशच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू ठेवली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी ६ महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई- वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT